म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

प्रश्नी निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी करतानाच जबरदस्तीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडू, असा इशारा मराठा समाजाचे नेते आबा पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिला.

वाचा:

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक प्रवेश तसेच स्पर्धा परीक्षांबाबत काही प्रश्न तयार झाले आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जाहीर केली आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करताना आबा पाटील म्हणाले, राज्य सरकारने पाच ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भात निर्णय घ्यावा. आम्ही त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देत आहोत. या काळात निर्णय घेतला नाही तर सहा तारखेला मुंबईत मातोश्रीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

ते म्हणाले, या परीक्षा पुढे न ढकलता जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडण्यात येईल असा इशारा देताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मातोश्रीतून बाहेर पडण्याची गरज आहे. मराठा समाजाशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य लक्षात येणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here