मुंबई:
मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे सुरु राहण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री यांनी आज बैठक घेऊन मध्यस्थी केली त्यामुळे हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे. हे रुग्णालय बंद होणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. त्यासाठी आवश्यक तो निधी उभारण्याचेही आश्वासन दिले. दरम्यान,रुग्णालयासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवारांनी दिल्याचे मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा स्वस्तात देणारे वाडिया रुग्णालय बंद झाले नाही पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी प्रारंभीपासून घेतली होती. आज नस्ली वाडिया हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीस उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व इतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची देखील या बैठकीस उपस्थिती होती.

महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु राहील तसेच यातील कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्या देखील अबाधित राहतील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

वाडिया रुग्णालयासाठी ४६ कोटी देणार

दरम्यान, वाडिया रुग्णालयाच्या पुनरुज्जीवनासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्याची माहितीत मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या रुग्णालयाच्या समस्येसंदर्भात शर्मिला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी अजित पवारांची भेट घेतली.

राज्य सरकार आणि महापालिकेकडून मिळणारे अनुदान थकीत असल्याचं कारण देत वाडिया रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णालयं बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मागील आठवड्यापासून वाडिया हॉस्पीटलने नव्या रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रियाही थांबवली आहे. अनुदानाअभावी वैद्यकीय सेवा आणि औषधांसह विविध सेवा देणाऱ्या व्हेन्डर्सना पैसे देता आलेले नाहीत. मात्र या प्रकरणात मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी लक्ष घातलं आणि हा प्रश्न तडीस नेला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here