साताराः मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहताना खासदार यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. ‘आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत त्यामुळं विजय निश्चित आपला होईल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळं नैराश्य आलेल्या बीडमधील एका विद्यार्थ्यांना गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘विवेक रहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळं आत्महत्या केली. रहाडे परिवारासाठी ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. समाजातील नवयुवकांना आमचे आवाहन आहे. राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणे हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने हानिकारक आहे, असा धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही,’ असं अवाहन उदयनराजे यांनी केलं आहे.

‘मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहे हे मान्य आहे त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत त्यामुळं विजय निश्चित आपला होईल.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे विवेक निराश होता. या नैराश्यातूनच बुधवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आताच ‘नीट’ परीक्षा दिली आहे.
गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल,’ असं त्यानं चिठ्ठीत म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here