इचलकरंजी येथील आवाडे कुटुंबियातील तब्बल १८ लोकांना करोनाची बाधा झाली होती. यामध्ये आमदार आवाडे यांच्यासह माजी मंत्री कल्लाप्पाणा आवाडे यांचाही समावेश होता. महिनाभराच्या उपचारानंतर सर्वजण करोनामुक्त झाले. कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी तर वयाच्या नव्वदाव्या वर्षी करोनावर मात केली. राहूल आवाडे यांनीही त्याच्यावर विजय मिळवला.
काल राहूल आवाडे यांना पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांनी करोनाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटव्ह आला. त्यांना उपचारासाठी रूणालयात दाखल करण्यात आले आहे. एकदा करोनातून बरे झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही असा दावा केला जात असताना आवाडे दुसऱ्यांदा बाधित झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत ४४ हजार लोकांना करोनाची बाधा झाली. यातील ३३ हजार रूग्ण बरे झाले. सध्या दहा हजार रूग्णावर उपचार सुरू आहेत. इचलकरंजी करोना संसर्गात आघाडीवर आहे. गेल्या आठ दिवसात करोना संसर्गाचे प्रमाण निम्यावर आले आहे. अशावेळी आवाडे यांना दुसऱ्यांदा लागण झाली आहे. एकदा करोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा तो होत नाही असे म्हणत दुर्लक्ष केल्याने त्याचा त्रास पुन्हा होऊ शकतो हेच स्पष्ट झाले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times