भदोही, : उत्तर प्रदेशात हाथरस आणि बुलंदशहर सामूहिक बलात्कार प्रकरणं उजेडात आल्यानंतर देशभर वादळ उठलेलं असतानाच दुसरीकडे राज्यातल्या शहरात आणखीन एका अनुसूचित जातीतल्या मुलीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. १४ वर्षांच्या या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास येत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या करण्यात आलीय. तिचा मृतदेह बाजरीच्या शेतात आढळून आला.

भदोहीमधल्या गोपीगंज परीसरातील राजा राम तिवारीपूर भागात ही घटना उघडकीस आलीय. गुरुवारी दुपारी या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर अनेकांना धक्का बसला. मुलीचं शीर छिन्न-विछिन्न करून अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आलीय.

वाचा :

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती देता येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं असलं तरी प्राथमिकदृष्ट्या बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

वाचा : वाचा :

प्रकरण

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अनुसूचित जातीतील पीडित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आणि पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीनंतर अवघ्या देशालाच धक्का बसला. गेल्या मंगळवारी या मुलीनं दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय आणि उपस्थितीशिवाय मुलीच्या मृतदेहावर अर्ध्यारात्रीच अंत्यसंस्कार उरकल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून करण्यात आलाय. देशभर या प्रकरणात आक्रोश व्यक्त करण्यात येतोय.

बलरामपूर बलात्कार प्रकरण

हाथरस प्रकरणानंतर लगेचच उत्तर प्रदेशच्याच बलरामपूरमध्ये आणखी एका २२ वर्षीय दलित विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्काराचं प्रकरण समोर आलं. या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या मुलीवरही घाईघाईनं अंत्यसंस्कार उरकण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

वाचा :

वाचा :

बुलंदशहर बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशच्याच बुलंद शहरात एका अल्पवयीन तरुणीनं आपल्या एका शेजाऱ्यावर नशेचा पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप केलाय. मुलीच्या आरोपानुसार, तक्रार केली तर अॅसिड फेकण्याची धमकी आरोपीनं दिली. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झालाय. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

आझमगड बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशच्याच आझमगढमध्ये एका तरुणानं क्रूरतेची हद्दच ओलांडली. तरुणानं आठ वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना तरुणानं तिला गाठलं आणि आपल्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीनं आपल्या कुटुंबीयांना याबद्दल सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here