हाथरसः हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार ( ) ) यांच्यावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. प्रशासनाने धमकी देऊन दबाव आणल्याचा आरोप केला पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. हाथरसचे जिल्हाधिकारी पीडितेच्या कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडिया काही दिवसांत निघून जाईल. पण प्रशासन तर इथेच आहे, असं जिल्हाधिकारी या व्हिडिओमध्ये बोलत आहेत. तर आम्हाला प्रशासनाकडून धमकावलं जात आहे. प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

व्हिडिओमध्ये हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार हे पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलताना दिसून येत आहेत. तुम्ही आपली विश्वासार्हता गमावू नका. अर्धे मीडियावाले निघून गेले आहेत. अर्धे उद्या उद्या सकाळी जातील. उद्या संध्याकाळपर्यंत दोन-चार उरतील. पण आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता जबाब बदलायचा की नाही हे तुमच्या आहे, असं जिल्हाधिकारी म्हणालेत.

तुमची मुलगी करोनाने मेली असती तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली असती का? आम्हाला धमक्या मिळत आहेत. वडिलांना धमकावलं जात आहे. त्यावेळी परिस्थिती अशी होती की मनात जे येतंय चे आम्ही बोलत होतो. आता ही लोकं आम्हाला इथं राहू देणार नाहीत, असा आरोप पीडितेच्या वहिनीने केला आहे.

प्रशांत कुमार म्हणाले – बलात्कार झाला नाही

दरम्यान, उत्तर प्रदेशचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. मुलीवर बलात्कार झालेला नाही. गळ्यावर झालेली गंभीर दुखापती आणि धक्क्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालातही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे, असं प्रशांत कुमार म्हणाले.

राहुल, प्रियांका गांधी दिल्लीला परतले

हाथरसमधील कथित बलात्काराच्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. हाथरसकडे रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ग्रेटर नोएडाजवल पोलिसांनी अडवलं. त्यांना त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना एक्स्प्रेस वे वरील एफ-१ हेस्ट हाउसमध्ये नेण्यात आलं. पण नंतर दोन्ही नेत्यांना युपी पोलिसांनी सोडलं. हाथरसला जाता न आल्याने या दोन्ही नेत्यांना हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटता आलं नाही. युपी पोलिसांनी सोडल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. यापूर्वी काँग्रेस कार्यकर्ते आणि युपी पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेत राहुल गांधी जमिनीवर कोसळले. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here