चंद्रावर रोव्हर उतरवण्यास संयुक्त अरब अमिरातीला यश आल्यास अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरणार आहे. अमेरिका, सोव्हिएत युनियन रशिया आणि चीन या देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिराती २२१७ पर्यंत मंगळावर आपली पहिली वस्ती बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी संशोधन, मोहीम सुरू केली आहे. युएईचे नेते शेख मोहम्मद यांनी ट्विटरवर म्हटले की, अमिरातीने चंद्रावरील अनेक बाबी समोर आणण्यासाठी या मोहिमेची आखणी केली आहे. चार वर्षानंतर म्हणजे २०२४ मध्ये रोव्हर अवकाशात झेपवणार आहे. त्याच वर्षी अमेरिकेची अंतराळ संस्था नासादेखील चंद्रावर आपला अंतराळवीर पाठवणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच महिला अंतराळवीराचा सहभाग असणार आहे.
वाचा:
वाचा:
या चांद्रमोहिमेतील रोव्हरमध्ये दोन हाय रिझोल्यूशन कॅमेरे, मायक्रोस्कोपिक कॅमेरा, एक थर्मल इमेजरी, एक प्रोब आणि अन्य उपकरण आहे. हा रोव्हर चंद्राचे भूपृष्ठ, मोबिलिटी आणि इतर बाबींबाबत अभ्यास करणार आहे. हे रोव्हर चंद्राचा भूपृष्ठ भाग, रात्रीच्या वेळी दिसणारी पृथ्वी, थर्मल इमेज, सेल्फ-इमेज, नेव्हिगेशन डेटा यासह किमान १००० छायाचित्रे पाठवणार आहे. सोव्हिएत युनियन रशियाने १९६६ मध्ये सर्वप्रथम LUNA9 हे रोव्हर चंद्रावर उतरवले होते. त्याशिवाय, आतापर्यंत फक्त चीन आणि अमेरिकेलाच चंद्रावर सॉफ्ट लँडिग करण्यास यश मिळाले आहे.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times