मुंबई: महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि कृती उलटी करायची… रामाचं नाव घ्यायचं आणि कृती नथुरामाची करायची… ही भाजपची जुनीच पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे, असा जोरदार टोला लगावतानाच कॉंग्रेसचे नेते यांना झालेल्या धक्काबुक्कीचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी निषेध केला आहे. ( Leader Targets )

वाचा:

हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करून खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्याला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. भाजपने ज्या पद्धतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे, नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

राष्ट्रवादीचे खासदार यांनीही राहुल गांधी यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकाराचा निषेध केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. येथील पीडीत भगिनीला न्याय मिळवून देण्याऐवजी तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले संसद सदस्य राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करून ताब्यात घेणे, हे अन्यायकारकच नाही तर निंदनीय आहे, असे तटकरे म्हणाले. या दडपशाहीचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. उत्तर प्रदेश सरकारने व केंद्र सरकारने यात लक्ष घालून योग्य कारवाई करायलाच हवी, अशी मागणी तटकरे यांनी केली.

वाचा:

दरम्यान, राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्यानंतर व हाथरसमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला. सांगली आणि नाशिक येथेही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अशाच प्रकारे राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा थोरात यांनी दिला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here