हा नव वर्षातील पहिला सण. तिळगूळ वाटून, पतंग उडवून आनंदात आणि उत्साहात हा सण आपण साजरा करतो. अगदी तसेच संक्रांतीच्या दिवशी ‘सुगड’ पूजनाला महत्व असते. सुवासिनी एकत्र येऊन सुगड पुजतात. चला तर मग पाहूयात सुगड पूजनाची शास्त्रशुद्ध पद्धत.

सुगड म्हणजे काय ?

भारतातील सर्वच सणवार शेतीशी संबंधित आहेत. पिकाची लागण करताना जसे सण साजरे होतात, अगदी तसेच सण पिकं काढणीच्या वेळी साजरे केले जातात. शेतीमुळे पिके हाती आल्यानंतर त्याची पूजा केली जाते. ‘सुगड’ म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात ‘सुगड’ असा झाला. शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते.

कसे करावे ?

पूजा मांडण्याआधी पाटाच्या किंवा चौरंगाच्या भोवती रांगोळी काढावी. रांगोळीच्या मधोमध स्वास्तिक काढावे, पाटाला किंवा चौरंगाला हळदी कुंकू वाहून पूजा मांडायला सुरुवात करावी.

ऊस, तीळ, गाजर, शेंगदाणे, बोरं, गव्हाच्या लोंब्या, तिळगुळ आणि हरभरा सुगडांमध्ये भरून ठेवावे.

सुगडावर हळद-कुंकू लावलेली दोर गुंडाळावी.

पाट/चौरंगावर लाल वस्त्र ठेवून, तांदूळ आणि गहू त्यावर ठेवावे. नंतर एक एक करून, भरलेले सुगड त्यावर मांडावेत.

पूजा मांडल्यानंतर त्याचा बाजूला दिवा लावावा. शेवटी सुगडावर हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा.

मांडलेल्या पूजेला तीळगुळ, हलवा, फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा.

अशा रितीने सुगडाची मांडणी आणि पूजा यथायोग्य पद्धतीने करता येईल.

यानंतर सुवासिनी एकमेंकांच्या घरी जाऊन वाणांची देवाण-घेवाण करतात. काही ठिकाणी सुगड दान करण्याची ही पद्धत असते. आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here