नगर: ‘माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मी मूळचा बंडखोर आहे. कुठल्याच पक्षात अॅडजेस्ट होण्याचा माझा स्वभाव नाही. सध्या भाजपमध्येही मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. बंडखोरी जास्त काळ दाबून ठेवली तर त्याचा स्फोट होतो,’ असे वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. यांनी केले. ( Addressed workers In )

वाचा:

धडाकेबाज विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. विखे यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी यावेळी खडेबोल सुनावले. अनेक दिवसानंतर डॉ. विखे यांचे बेधडक भाषण ऐकायला मिळाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रथमच विखे यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यात पक्षामध्ये कुरबुरीही सुरू आहेत. हा धागा पकडून डॉ. विखे यांनी सर्वांनाच खडे बोल सुनावत स्वत:बद्दलही धडाकेबाज विधाने केली.
विखे म्हणाले, ‘लोकांना वाटते की मी रॅश आहे. उद्धटपणे बोलतो. माझे वडीलही असेच म्हणतात. मग असे असेल तर लोक मला मते कशी देतात? वास्तविक पहाता मी पारदर्शक माणूस आहे. सत्य तेच बोलतो. कधी लाचारी स्वीकारीत नाही. वेळकाढूपणा करीत नाही. जे होणार नाही, त्याची खोटी आश्वासने देत नाही. माझ्याकडे वेळ नाही. काम होणार असेल तर प्रामाणिक प्रयत्न करतो. माझ्या स्वभावाचा हळूहळू तुम्हाला अंदाज येईल. पदाचा मोह मला नाही. मी कोण आहे, माझे वडील काय आहेत, माझे आजोबा काय होते, याचा माझ्या वैचारिकतेवर व वागण्यावर काहीच परिणाम होत नाही. पद आले काय नि गेले काय मला फरक पडत नाही.’

वाचा:

यावेळी जिल्हाध्यक्ष मुंडे यांना डॉ. विखे यांनी सल्ला दिला. ते म्हणाले, ‘पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली आपण काम करीत आहोत. त्यातूनच तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात. त्यामुळे मी तुमचे थोडे ऐकतो. मात्र माझा तुम्हाला सल्ला आहे. तुम्ही सहनशीतेचा फार अंत पाहू नका. बंडखोरी फार काळ बंद ठेवली तर स्फोट होतो. तुम्ही पुढाकार घ्या, जे चुकतात त्यांना सरळ सांगा. आपला प्रयत्न कोणा एका व्यक्तीला मोठे करण्याचा नाही. पक्षवाढीचा आहे. त्या दृष्टीने तुम्ही जिल्ह्यात काम करीत रहा. आज कोणाच्या विरोधात बोलण्याची सोय राहिली नाही. आज एखाद्याच्या विरोधात बोललो आणि उद्या त्यांच्यासोबतच सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर अडचण व्हायची. त्यामुळे आपण पक्षावरच लक्ष केंद्रित करू. संघटनेसाठी मला जेवढे परवडेल तेवढे मी देईन. परवडेल याचा अर्थ समजून घ्या. ज्यावेळी मला परवडणार नाही, त्यावेळी जिल्ह्यातील निवडणुका संपून जातील. पक्षवाढीसाठी तुम्ही संकल्पना द्या. मी त्यासाठी मदत करतो. माझे आजोबा होते तेव्हा त्यांचे कार्यकर्ते फाटके तुटके होते. कोणी वाळू तस्कर नव्हते. गळ्यात सोन्याची चेन आणि सफारी घालणारे नव्हते. तरीही माझे आजोबा बाळासाहेब विखे पाटील राजकारणात मोठे झाले. म्हणून आपल्याकडेही गाड्याघोडेवाले नाहीत.सर्वसामान्य माणसांसाठी मी आहे. वाळू तस्करांच्या गाड्या सोडण्यासाठी नाही. अवैध धंद्याना संरक्षण मिळण्याच्या अपेक्षेने माझ्याकडे येऊ नका.’ अशा शब्दांत डॉ. विखे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here