वाचा:
लॉकडाऊन नंतर टप्प्याटप्याने अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, अद्याप राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच आज शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीचे मंदिर उघडण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
वाचा:
मंदिर उघडण्याबाबत शिर्डीच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले होते, त्यासंदर्भात आपली भूमिका काय, असे लोखंडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘शिर्डीचे मंदिर चालू झाले पाहिजे. परंतु त्याठिकाणी श्री साई बाबांचे जे भक्त येणार आहेत, त्यांना ट्रेन, गाड्या व विमाने उपलब्ध नसतील, तर त्यांचे शिर्डीत येण्याचे प्रमाण कमी होईल. शिर्डीत सुद्धा करोनाचे मोठ्या प्रमाणात बाधित आहेत. मंदिर सुरू झाल्यानंतर दुकानदार, रहिवासी तसेच बाबांचे भक्त यांनी दक्षता घेतली तरच शिर्डीची परिस्थिती सुधारेल. सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून मंदिर चालू करण्याची गरज आहे, ही खासदार म्हणून माझी मागणी आहे,’ असेही लोखंडी स्पष्ट केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times