नोएडाः कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात ग्रेटर नोएडाच्या इकोटेक फॉरेस्ट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि यांच्यासह २०३ कॉंग्रेस नेत्यांविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये या सर्वांवर गंभीर कलम लावण्यात आले आहेत. गौतमबुद्ध नगर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे.

जमावबंदीचे उल्लंघन केल्यानं आणि साथीच्या काळात सामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सुमारे २०० कार्यकर्त्यांसह हाथरसला जाण्यासाठी डीएनडी मार्गे नोएडामध्ये दाखल झाले. यात सुमारे ५० वाहनांचा ताफा होता. त्या सहभागी असलेल्या सर्वांना जमावबंदी आणि करोना व्हायरसमुळे न जाण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण ताफ्यात सहभागी झालेले सर्व कार्यकर्ते आणि वाहनांनी वाहतुकीचे नियम आणि सर्वसामान्यांच्या प्रवासात व्यत्यय आणून ते यमुना एक्स्प्रेस वेच्या दिशेने वेगाने गेले.

दोन वाहनांची धडक

नोएडा एक्स्प्रेस वेवर ताफ्यातील दोन वाहनांमध्ये धडक झाली. यानंतर यमुना एक्स्प्रेस वेवर झिरो पॉईंटवर ताफा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिथे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा केला आणि पोलिसांना मारहाण केली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यमुना एक्स्प्रेस वे वर पायी चालण्यास सुरवात केली. यामुळे एक्सप्रेस वे दोन्ही बाजूंनी जाम झाला होता. यामुळे अनेक अॅम्ब्युलन्स देखील अडकल्या होत्या.

जमावबंदी असताना आणि कुठलीही परवानगी न घेता इतक्या मोठ्या संख्येने बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी जमावबंदींचे उल्लंघन केलं. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असंही त्यांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह २०३ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here