म. टा. खास प्रतिनिधी, : ड्रग्जमुळे एकीकडे बॉलिवूड चर्चेत असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांनी देखील ड्रग्ज तस्करांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने डोंगरी परिसरातून दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५० लाख किमतीचे एक्स्टॅसी गोळ्या हे पार्टी ड्रग्ज हस्तगत केले आहे.

उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या आणि प्रतिबंधित असलेल्या एक्स्टॅसी गोळ्या काही जण डोंगरी आणि जे. जे मार्ग परिसरात विकत असल्याची माहिती मालमत्ता कक्षाचे सहायक निरीक्षक अमित भोसले यांना मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धीरज कोळी, सहायक निरीक्षक सुनील माने, योगेश खानुरे यांच्या पथकाने डोंगरी परिसरात सापळा रचून या गोळ्या बेकायदा विक्री करणाऱ्या आमिर रफाई आणि इनायत अली या दोघांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये दोघांकडे अडीचशे गोळ्या सापडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गोळ्यांची किंमत सुमारे ५० लाख असून या दोघांचे उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यातील ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here