परभणी जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुणी औरंगाबादेत शिक्षण घेत असताना ती बायपास परिसरात राहत होती. तिची मोबाइलवर बेगमपुरा नॅशनल कॉलनीतील मोहंमद उमर मोहंमद जावेदसोबत मैत्री झाली. ओळखीतून उमर याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ओळखीनंतर उमर याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बायपास येथील घरात बलात्कार केला. त्यानंतर उमर याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यावरून तरुणीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात मोहंमद नूर व मोहंमद इस्माइलविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सदर मुलीने धर्मांतर करून मोहम्मद उमरसोबत लग्न केले. लग्नानंतर तीन महिन्यांनी पतीकडील लोकांनी छळ करण्यास सुरुवात केली. माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, असा तगदा लावला. पत्नीने नकार देताच उमरने घरातील सोन्याचे दागिने व लॅपटॉप लंपास केला. याचा जाब विचारण्यासाठी पत्नी गेली असता तिला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी टाळाटाळ करत तरुणीला हाकलून लावले.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
बेगमपुरा पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजताच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आयुक्तांना खडेबोल सुनावले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, विनायक पांडे, उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे, तालुकाप्रमुख हनुमंत भोंडवे, मनोज सोनवणे, ईश्वर पारखे, आशिष शिंदे, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्रतिभा जगताप, मीरा देशपांडे, विजया कुलकर्णी, संगीता शर्मा यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्यात मोहंमद उमर मोहंमद जावेद, मोहंमद इब्राहिम, सह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times