गांधी जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी आज एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नायक आणि काही प्रतिकांमध्येच अडकवण्यात आल्याची खंत त्यांनी सुरुवातीला व्यक्त केली आहे. त्यांच्याकडे कमालीचा प्रांजळपणा व तटस्थपणा होता. एखादी चूक किंवा अपराध, मग तो परकियांकडून घडलेला असो की स्वकियांकडून. त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत. मात्र, नेमकं हेच आज विसरलं जातंय,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘गांधीजींमध्ये अहंभाव नव्हता. माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा. कारण, ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे हे सांगण्याचा प्रांजळपणा त्यांच्यात होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं सुरू झालं आहे,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
वाचा
‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला हे गांधीजींचं तत्व अंगिकारलं जात असेल तर ठीक. पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट आहे. करोनाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरू आहे. त्यात गांधीजींचं प्रांजळपण व तटस्थपण अंगिकारलं तरी अनेक प्रश्नावर उत्तरं सापडतील,’ असं म्हणत राज यांनी गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times