अहमदनगर: दरवर्षी नवरात्रात भाव खाणाऱ्या झेंडूच्या फुलांची करोनामुळे यावर्षी शेतातच माती करण्याची वेळ आली आहे. करोनामुळे मंदिरे बंद, विविध उत्सवांवर बंधने आल्याने झेंडूचे भाव पडले आहेत. त्यामुळे फुलांची तोडणी करून ती बाजारात घेऊन जाणेही परवडणारे नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकरातील झेंडूच्या पिकावर नांगर फिरविला.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील अशोक धोंडीभाऊ पाडेकर या शेतकर्‍याने चार एकर झेंडूवर दुर्दैवाने रोटाव्हेटर फिरवला. झेंडूला चांगला भाव मिळेल, या आशेवर त्यांनी चार एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली. काही महिन्यांपूर्वी कलकत्ता झेंडूची रोपे विकत घेवून चार एकर शेतामध्ये लागवड केली होती. त्यासाठी फवारणी, खते औषधे यांचा मोठा खर्च झाला होता. चार एकर झेंडूसाठी त्यांचा सव्वा दोन लाख रूपयांचा खर्च झाला होता. त्यानंतर झेंडूची फुले विक्रीसाठी उपलब्ध झाली. गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांना बरा भाव मिळाला. नंतर झेंडूचे भाव पाच ते दहा रुपये किलो झाला. आता फुले आली आहेत, ती दसऱ्यापर्यंत टिकणार नाहीत. सध्या भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांनी नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. मंदिरे खुली झाली असतील तरी फुलांना भाव मिळाला असता. पण मंदिरे केव्हा उघडणार, हेही स्पष्ट झालेले नाही.
आधीच शेतमालाला बाजारभाव नाही. निसर्ग चक्रीवादाळाचे संकट, मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला. उत्सवाच्या काळात हमखास उत्पन्न मिळवून देणारी फुलशेतीही यावर्षी तोट्यात गेली, अशी शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here