मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सध्या पोलीस कोठडीत असून, तिला पतीच्या हत्येत मदत करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शेजाऱ्याने मृताच्या भावाला फोन करून माहिती दिली. घरात तुझ्या भावाची हत्या झाल्याची माहिती शेजाऱ्याने त्याला दिली. हे ऐकून त्याला धक्काच बसला. मृताचा लहान भाऊ ओमकार गायकवाड हा स्थानिक रुग्णालयात काम करतो. त्याने आणि त्याच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटना घडली त्यावेळी आई रात्रपाळीला गेली होती. तर ओमकार हा मित्रासोबत होता.
घरी परतल्यानंतर भाऊ हा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांत महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही आरोपी महिलेला अटक केली आहे. मला मयूरसोबत राहायचे नाही, असे मी अनेकदा माझ्या कुटुंबीयांना तसेच मयूरच्या कुटुंबीयांना सांगितले. मुंबईत राहणाऱ्या माझ्या नातेवाईक मुलाशी लग्न करायचे असल्याचे अनेकदा सांगितले. विनंत्या केल्या, पण कुणीही ऐकायला तयार नाही. त्यामुळे पतीची हत्या केली, अशी कबुली महिलेने दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times