मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील बलात्काराच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. ‘उत्तर प्रदेशचं सरकार काहीतरी लपवतंय,’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हाथरस व बलरामपूर येथील बलात्काराच्या घटनानंतर संपूर्ण देशभरात संताप आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकार व केंद्रातील मोदी सरकारवरही विरोधकांनी निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारची वक्तव्ये केली ते पाहता सरकार काहीतरी लपवू पाहतंय हे स्पष्ट आहे,’ असं सुळे यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘अवघ्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री वा मुख्यमंत्री यावर काहीही बोललेले नाहीत. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी सुळे यांनी केली आहे. ‘देशात अराजकासारखी परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशातही कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. यांच्या सरकारला उत्तर प्रदेशातील महिलांचं संरक्षण करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,’ असंही त्या म्हणाल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here