वाचा:
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांनी जनेतवर आश्वासनांची खैरात केली होती. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेला टोलचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.
वाचा:
मनसेचे सरचिटणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यासोबत देशपांडे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध प्रार्थनेत एका शब्दाचा बदल करून राज्य सरकारला टोला हाणला आहे. ‘रघुपती राघव राजाराम… पतित पावन सीताराम… सरकार को सन्मती दे भगवान’ असं त्यांनी म्हटलं आहे. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times