अहमदनगर: येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जवळपास एक तास थोरात यांच्या घरासमोर ठिय्या मांडला होता. या आंदोलनात महसूलमंत्री थोरात यांच्या भगिनी संगमनेरच्या नगराध्यक्षा तसेच त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील सहभागी झाले होते. दरम्यान, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मी माझ्या भावाकडे ओवाळणी मागत आहे,’ अशा भावना यावेळी दुर्गा तांबे यांनी व्यक्त केल्या.

वाचा:

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज, २ ऑक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे या देखील सहभागी झाल्या होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘माझे बंधू बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर आम्ही सर्व मराठा आंदोलक जमलेलो आहोत. थोरात यांच्याकडे माझी मागणी आहे की, मराठा आरक्षणासाठी ज्या-ज्या त्रुटी आहेत, कमतरता आहेत, त्या दूर कराव्यात. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कारण हा समाज खूप विखुरलेला असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरीत स्थान मिळत नाही. मिळाले पाहिजे, यासाठी माझ्या भावाकडे मी ओवाळणी मागत आहे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here