वृत्तसंस्था: मकर संक्रांतीनिमित्त रंगलेल्या पतंग महोत्सवातही नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून (सीएए) दोन गट पडल्याचे दिसून आले. काहींनी सीएएचे समर्थन करणारे तर, काहींनी निषेध करणारे पतंग उडविले. त्यात भारतीय जनता पक्ष आणि कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
‘इंडिया अगेन्स्ट सीएए’, ‘सेव्ह कॉन्स्टिट्यूशन, सेव्ह इंडिया’, ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’ अशा घोषणा लिहिलेले पतंग आकाशात उडत होते. कायद्याचे समर्थन करणारे ५०,००० पतंग भाजपच्या एका नेत्याने वितरित केले होते. राजकोटमधील या नेत्याने त्यासाठी पूर्वतयारी केली होती. कार्यकर्त्यांमार्फत ते उडविण्यात आले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही ‘सीएए’ला समर्थन देणारा एक पतंग स्वत: उडविला. येथील खोक्रा परिसरात त्यांनी पतंगोत्सवात सहभाग घेतला. …. जीवन पतंगासारखे आकर्षक आहे त्याप्रमाणेच नवनवी उंची सतत गाठायला हवी. गुजरात हे विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करणारे राज्य आहे. ही वाटचाल आम्ही यापुढेही सुरू ठेऊ. -विजय रुपानी, मुख्यमंत्री, गुजरात
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times