सुरतः ‘१०८’ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला कर्मचारी रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी देवासमान ठरले. या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंच. यासोबत १.२० लाखाचा मुद्देमालही त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला.

ही घटना रंदेर भागातील पालनपूर पटिया येथील आहे. या भागातील विजय डेअरी वरून ‘१०८’ आपत्कालीन सेवा देणाऱ्यांना एक फोन आला. यानंतर तिथे रुग्णवाहिका पाठवण्यात आली, अशी माहिती १०८ सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.

आम्हाल फोन येताच रंदेर भागात असलेली १०८ आपत्कालीन सेवेलीत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. इमर्जन्सी मेडिलकल टीमचे ( EMT) सब्बीर खान बेलीम आणि रुग्णवाहिका चालक नीरज गमीत हे घटनास्थळी दाखल झाले. तिथे एक रुग्ण बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. सुरेंद्र सिंह बारड (वय ४७ ) असं या रुग्णांचं नाव आहे. तो ओलपड इथला राहणार आहे आणि विजय डेअर येथे तो मिठाई घेण्यासाठी आला होता. डेअरीच्या ठिकाणी तो अचानक कोसळला आणि बेशुद्ध पडला, अशी माहिती GVK-EMRI चे प्रोग्रॅम मॅनेजर आणि समन्वयक फयाज पठाण यांनी दिली.

EMT सब्बीर खान बेली हे घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी रुग्णाला तपासले. रुग्णाला छातीत कळा येत होत्या. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षणं त्यांना दिसून आली. त्याने रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. यावेळी रुग्णाकडे काही रोख रक्कम आणि दागिनेही होते. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सब्बीर खान आणि नीरज गमीत यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतलं. रुग्णाकडे आढळून आलेली रोख रक्कम आणि दागिने त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे सोपवले, अशी माहिती फयाज पठाण यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here