नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती यांना आज करोना झाल्याचे पाहायला मिळाले. ट्रम्प यांची तब्येत लवकर सुधारावी, अशी कामना बरीच लोकं करत आहेत. भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने यावेळी ट्रम्प यांना करोनामधून बाहेर पडण्यासाठी खास मंत्र दिल्याचे

सोशल मीडियावर सेहवाग हा चांगलाच प्रसिद्ध आहे. आपल्या वक्तव्यामुळे सेहवाग सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. यावेळी तर सेहवागने संतांसारखा पेहराव केला आहे. सेहवागने यावेळी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्याचबरोबर त्याने रुद्राक्षाची माळही घातलेली आहे. यावेळी सेहवागने ट्रम्प यांना करोनापासून लवकर सावरण्यासाठी एक मंत्र दिल्याचेही पाहायला मिळत आहे.

सेहवागने आपल्या फेसबूकवर याबाबत एक संदेश लिहिलेला आहे. या पोस्टमध्ये सेहवागने म्हटले आहे की, ” ट्रम्प यांना करोनामधून बाहेर पडण्यासाठी बाबा सेहवागचे आशिर्वाद. गो करोना, गो करोना…!” काही वेळातच सेहवागची ही पोस्ट चांगलीच व्हायरस झाल्याचे पाहायला मिळत आहे. फक्त एका तासामध्ये सेहवागच्या या पोस्टला आतापर्यंत एक लाख लोकांनी लाइक्स दिलेले आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी सेहवागची ही पोस्ट शेअरही केली आहे. त्याचबरोबर या पोस्टवर बऱ्याच कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

आज ट्रम्प यांनी आपल्याला करोना झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी मला आणि पत्नी मेलानिया यांना करोना झाल्याचे सांगितले आहे. सध्याच्या घडीला ट्रम्प आणि त्यांची पत्नी क्वारंटाइनमध्येच आहेत. बऱ्याच जणांनी यावेळी करोनामधून बाहेर पडण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here