मुंबई : मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी बाजार बंद होताना सोने ५०५४४ रुपयांवर स्थिरावले. त्यात २०१ रुपयांची वाढ झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ३७ रुपयांची किरकोळ वाढ झाली. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१३८९ रुपये झाला. चांदीच्या भावात मात्र एक किलोला ९१५ रुपयांची घसरण झाली. एक किलोला ६१४२३ रुपये झाला.

goodreturns या वेबसाईटनुसार शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९२९० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०२९० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९२०० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३६७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९७६० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२६७० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३७० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२७६० रुपये आहे.

जागतिक बाजारात सोन्याचा भाव १८९५ डॉलर प्रती औंस असून चांदीचा भाव २३.६० प्रती औंस आहे. युरोपात करोनाची दुसरी लाट आल्याच्या भीतीने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. यामुळे त्यांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी कमॉडिटी बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींना उतरती कळा लागली आहे.

आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार आणि मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या वित्त संस्थांकडून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते.दसरा आणि दिवाळी महिनाभरावर असल्याने सराफांनी सोने खरेदीवर भर दिला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात सोने आणि चांदीची मागणी वाढली असल्याने कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here