वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर जगभरातून त्यांना चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा पाठवल्या जात आहेत. करोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर करण्यास नकार देणारे ट्रम्प आता मात्र करोनाच्या आजाराला हलक्यात घेऊ शकत नाहीत. ट्रम्प यांनी आणखी दुर्लक्ष केल्यास त्यांना त्याचा मोठा फटका बसण्याचा धोका असल्याचे तज्ञांनी सांगितले. ट्रम्प यांना तीन कारणांपासून धोका संभावत असल्याकडे तज्ञांनी लक्ष वेधले आहे.

युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नोलॉजी सिडनीमधील तज्ञ ब्रिआन ओलीवेर यांनी सांगितले की, कोविड हा रशियन रोलेटसारखा घातक आजार आहे. ज्यांचे वय अधिक आहे, ज्यांना आधीपासूनच इतर आजार आहेत, अशांना करोनाची बाधा होण्याचा धोका अधिक असतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोणती लक्षणे दिसून आलीत की नाही, याची माहिती समोर आलेली नाही. तर, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी प्रकृती चांगली असल्याचे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. मात्र, पत्नीच्या तुलनेत ट्रम्प यांना अधिक धोका आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे वय, वाढलेले वजन आदी बाबी या ट्रम्प यांच्याविरोधात आहेत.

वाचा:

अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनच्या (सीडीसी) मते, १८ ते २९ या वयोगटातील व्यक्तींच्या तुलनेत ६५ ते ७४ या वयोगटाली व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता ही पाचपट अधिक असते. त्याशिवाय मृत्यूचा धोका हा ९० टक्के असतो. अमेरिकेत मृत्यू झालेल्या करोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५४ टक्के असल्याकडे तज्ञांनी लक्ष वेधले आहे.

वाचा:

ट्रम्प यांचे अधिक वजन

ट्रम्प यांना वयाशिवाय त्यांचे अतिरिक्त वजनही त्यांना धोक्यात आणू शकतात. ट्रम्प यांची उंची ६ फूट ३ इंच असून वजन २४४ पाउंड (११० किलो) आहे. बॉडीमास इंडेक्स (BMI) ३०.५ आहे. ३० हून अधिक BMI असलेल्या व्यक्ती लठ्ठपणाच्या श्रेणीत येतात. ऑगस्टमध्ये आलेल्या एका अहवालानुसार, प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या, लठ्ठ असलेल्या करोनाबाधित व्यक्तींच्या मृतांचे प्रमाण हे सामान्य वजन असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील रुग्णालयात दाखल झालेल्या १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांपैकी एक तृतीयांश करोनाबाधित लठ्ठ होते. मात्र, वजन आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यू बाबत अधिक अभ्यास, संशोधन करणे आवश्यक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

वाचा:
ट्रम्प यांना तज्ञांचा सल्ला

ब्रिटनच्या लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रोपिकल मेडिसीनचे वरिष्ठ लेक्चरर थॉमस विंगफिल्ड यांनी सांगितले की, ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे, हे लवकर समजले हे चांगले झाले. ट्रम्प यांनी क्वारंटाइन होणे आवश्यक असून इतरांपासून दूर राहिले पाहिजे. योग्य व सकस आहार, आराम करणे आणि लक्षणांवर नजर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बहुतांशी करोनाबाधितांची प्रकृती पाच दिवसानंतर खालावते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

वाचा:

ट्रम्प यांना ‘हा’ दिलासा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी जगातील सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध आहे. त्याशिवाय अनेक तज्ञ डॉक्टर २४ तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असणार आहेत. त्याशिवाय ट्रम्प हे मद्यसेवन आणि धुम्रपान करत नाहीत. त्यामुळे इतरांच्या तुलनेत त्यांचे आरोग्य अधिक चांगले असू शकते. त्याशिवाय त्यांना किडनी, हृदयरोग आदी कोणतेही आजार नाहीत. त्यामुळे त्यांची जोखीम आणखी कमी होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here