मुंबई: राज्यात आज ४२४ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ३७ हजार ४८० इतका झाला आहे. सध्या राज्यातील २.६५ टक्के इतका आहे. ( Latest Updates )

राज्यात करोना बाधित रुग्णांचे रोजचे प्रमाण काहीसे कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी करोना बाधित दैनंदिन रुग्णांचा आकडा २५ हजारावर गेला होता. हा आकडा आता १५ हजारांपर्यंत खाली आला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे १५ हजार ५९१ नवीन रुग्ण आढळले असून आज १३ हजार २९४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७८.९१ टक्के एवढे झाले आहे.

पनवेलमध्ये आज ८७ रुग्ण दगावले

राज्यात करोना मृत्यूदर ही सर्वात चिंतेची बाब आहे. आज पुन्हा एकदा चारशेच्या वर रुग्णांना करोनाशी झुंज देताना प्राणास मुकावे लागले आहे. सरकारी नोंदीत आज ४२४ नवीन मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील २७२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहे तर ६५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहे आणि उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आजच्या मृतांच्या आकड्यात पनवेलमधील आकडे चिंता वाढवणारे आहेत. पनवेलमध्ये आज ८७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here