म. टा. प्रतिनिधी, नागपूर: कोव्हिड विषाणूचा विळखा शहराभोवती अंशत: का होईना कमी होत चालला आहे. पूर्वीच्या तुलनेत संशयितांच्या घशातील स्त्राव नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण कमी झालेले असले तरी एकूण संशयितांपैकी पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाणही आता सरासरीच्या तुलनेत शुक्रवारी १५ टक्क्यांवर घसरले. आज दिवसभर जिल्ह्यात एकूण ५९४५ संशयितांच्या घशातील स्त्राव नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील ५०२० जणांच्या घशातील स्त्राव नमुना निगेटिव्ह आढळला. तर ९२५ जणांना करोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. सरासरीने पॉझिटिव्ह येण्याचे हे प्रमाण १५ टक्क्यांवर आले आहे. तर करोनाच्या चाचणीत कुठलाही आजार न झाल्याचे निदान करण्यात आलेल्यांचे प्रमाण ८४ टक्क्यांवर गेले आहे. करोनाची लक्षणे असल्याच्या संशयातून निदानाला येणाऱ्यांपैकी बहुतांश जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे यातू सकारात्मक चित्र समोर येत आहे.

या घडामोडीत आज दिवसभरात जिल्ह्यातून १५१३ करोनाबाधितांना उपरारानंत कुठलीही लक्षणे नसल्याने डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या ७९,९६८ रुग्णांपैकी ६५१७७ रुग्णांनी आजावर मात केली आहे. आजारमुक्तीचा हा दर ८२ टक्के पर्यंत गेला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू नोंदविला गेला. त्यातील २२ जण हे महापालिका हद्दीतील तर ५ जण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणि एक जण जिल्ह्याच्या बाहेरील रहिवासी होता.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात १२,११७ सक्रिय करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातीलही सर्वाधिक ८७६७ रुग्ण हे महानगर पालिकेच्या हद्दीतील तर ३४५० रुग्ण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत.

नव्याने करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांमध्ये खासगी प्रयोगशाळांमधून आज सर्वाधिक ४४९ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये करोनाचा अंश आढळला. त्या खालोखाल अॅँटिजन रॅपिड टेस्टमधून २२७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेयोतूनही आज १३१ जणांना करोनाची बाधा झाल्यचे निदान करण्यात आले. त्यानंतर निरीतून आज ४७, एम्समधून ३८, माफ्सूतून १९ आणि मेडिकलमधून १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले.

शुक्रवारचे पॉझिटिव्ह-९२५
आजचे आजारमुक्त- १५३१
एकूण पॉझिटिव्ह- ७९९६८
एकूण आजारमुक्त- ६५१७७
एकूण सक्रिय करोनाबाधित- १२,२१७
जिल्ह्यातील बाधित- ३४५०
आजचे निगेटिव्ह- ५०२०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here