मुंबई: अभिनेता मृत्यू प्रकरणात (एनसीबी) आता अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या मोबाइलचा तपास करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास पथकाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सीबीआयकडून या प्रकरणात सिद्धार्थ पीठानीचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यतादेखील आहे.

वाचा:

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर या प्रकरणी एनसीबीने काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणसह सारा अली खान, रकुलप्रीत सिंह व श्रद्धा कपूर यांची चौकशी केली होती. या चारही अभिनेत्रींनी चौकशीदरम्यान केलेली विधाने व प्रश्नांची उत्तरे एकसारखीच असल्याचे आढळून आले आहे. यामुळेच तपास पथकाचा संशय बळावला आहे. याच चौकशीदरम्यान एनसीबीने दीपिकाचा मोबाइल ताब्यात घेतला होता. त्याचा आता तपास होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा:

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील अंमली पदार्थ संबंधांचा नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) आता वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला आहे. थेट चित्रपट कलाकारांना समन्स बजावण्याआधी ड्रग्ज कनेक्शनमधील दलालांचा शोध घेतला जाणार आहे. त्याच वेळी कुठलाही अभिनेता थेट रडारवर नसल्याचे एनसीबीमधील सूत्रांनी सांगितले आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूसंदर्भात अंमली पदार्थांचा विषय समोर आल्यापासून एनसीबीने आणि तिचा भाऊ शौविक या दोघांना अटक केली. त्यांच्या तपासात तसेच अटकेतील अन्य व्यक्तींच्या तपासात जी माहिती समोर आली आहे, त्याआधारे दीपिका पदुकोणसह सारा अली खान, रकुलप्रीत सिंह व श्रद्धा कपूर या चार प्रसिद्ध अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली आहे. याच श्रेणीत आता चार अभिनेत्यांचीही चौकशी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, पण प्रत्यक्षात अद्याप कुठलाही अभिनेता रडारवर नसल्याची माहिती मिळत आहे. आधी दलालांचा शोध घ्या, अशी सूचना एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना यांनीच अधिकाऱ्यांना दिली आहे, असे कळते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here