पुणे: मुद्द्यावर १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असतानाच राज्यातील सरकारचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी मराठा आरक्षणावर अगदी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. पार्थ पवारच काय असे दहा जण सुप्रीम कोर्टात गेले तर त्याचा राज्य सरकारच्या प्रयत्नांना हातभारच लागेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. ( Reacted To ‘ s Tweet )

वाचा:

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता वाढली आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला असला तरी मराठा समाज विविध मागण्या पुढे करत राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहे. सर्व मराठा संघटनांनी एकत्र येत १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाकही दिली आहे. त्यातच बीडमध्ये एका विद्यार्थ्याने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने हा मुद्दा अधिकच नाजूक बनला आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचे नातू यांनी या घटनेवर ट्वीटरच्या माध्यमातून तीव्र चिंता व्यक्त करत सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याअनुषंगाने आज शरद पवार यांना विचारण्यात आले असता पवार यांनी त्याचे स्वागतच केले.

वाचा:

‘मराठा आरक्षणावर कुणीही व्यक्ती कोर्टात जाऊ शकते. पार्थच काय, जर दहा लोक या प्रकरणात कोर्टात गेले तर त्याचा राज्य सरकारलाच फायदा होईल. शेवटी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला जी स्थगिती देण्यात आली आहे ती उठवली जावी, हाच आमचाही उद्देश आहे आणि त्यासाठीच राज्य सरकारने विनंती अर्ज केला आहे’, असे पवार यांनी नमूद केले.

मराठा तरुणांना केली विनंती

आत्महत्येच्या घटनेवर पवार यांनी चिंता व्यक्त केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आत्महत्येने सुटणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. विशेषत: तरुणांनी यात संयम दाखवायला हवा, अशी विनंती शरद पवार यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अगदी शंभर टक्के राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याशीही याबाबत माझे बोलणे सुरू आहे. सरकारचे म्हणणे कोर्टापुढे मांडावे आणि मराठा समाजात जी अस्वस्थता पाहायला मिळत आहे ती दूर व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे, असेही पवार यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here