दुबई, : चेन्नई सुपर किंग्सवर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने विजय मिळवला. या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नईवरील विजयानंतर हैदराबादच्या संघाने गुणतालिकेत चांगलीच झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये नेमका काय बदल झाला आहे, पाहा…

चेन्नईचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला. त्यामुळे चेन्नईच्या पराभवाची हॅट्रिक झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईचा संघ आतापर्यंत चार सामने खेळला आहे आणि त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ या गुणतालिकेत तळाला, म्हणजेच आठव्या स्थानावर असल्याचेच पाहायला मिळत आहे.

हैदराबादच्या संघाने या सामन्यात विजय मिळवला. हैदराबादचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. आतापर्यंत हैदराबादच्या संघाच्या नावावर चार सामने आहेत. या चार सामन्यांमध्ये हैदराबादच्या संघाला दोन पराभव मिळाले आहेत, तर त्यांनी दोन विजयही साकारले आहेत. हैदराबादच्या संघाच्या नावावर आता चार गुण जमा झाले आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत सातव्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान झालेला आहे. मुंबईनंतर दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. गुणतालिकेतील तिसरे स्थान यावेळी कोलकाता नाइट रायडर्स संघाकडे आहे. आजच्या विजयानंतर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानतर पाचव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. यावेळी सहावे स्थान विराट कोहलीच्या आरसीबीच्या संघाकडे आहे. गुणतालिकेत सातव्या स्थानावर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here