युपी सरकारने शुक्रवारी उशिरा प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली आहे. हे प्रथमच होईल जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास करणार्या पोलिसांच्या पथकचीही पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी केली जाईल. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रचंड नाराज आहे. याच कारणास्तव एसआयटीचा पहिला अहवाल येताच सरकारने मोठी कारवाई केली आहे.
यामुळे होणार नार्को चाचणी
या प्रकरणाची चौकशी एसआयटीद्वारे करण्यात येत आहे. एसआयटीशिवाय उच्च पातळीवरही आदेश देण्यात आला आहे. यानुसार वैज्ञानिकदृष्ट्याही या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांशिवाय त्यांची नार्को किंवा पॉलिग्राफ चाचणी करून जबाबांची सत्यता पडताळी जाणार आहे. एसआयटीने सरकारला ही शिफारस केली आहे. या आधारावर घटनेशी संबंधित असलेल्या सर्वांची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी घेतली जाईल.
या प्रकरणी अनेक व्हिडिओही समोर आले आहेत आणि तथ्य देखील आहेत. म्हणूनच, सर्व पुराव्यांबाबत वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे. यामुळेच सरकारने आरोपी, पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची आणि पोलिस तपास पथकातील सर्व कर्मचार्यांच्या नार्को आणि पॉलिग्राफ चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिलीय.
हे अधिकारी झाले निलंबित
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून हाथरसचे पोलीस अधीक्षक म्हणजेच एसपी विक्रांत वीर, सीओ राम शब्द आणि संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, एसआय जगवीर सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण सध्या त्यांचं नाव या यादीत नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times