मुंबई: महाराष्ट्रात इंजेक्शनची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे, परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयांत हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ( Writes To CM )

वाचा:

राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे २० हजार रुग्णांची भर पडत आहे. सरासरी ४५०ने दररोज मृत्यूंची संख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्त्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रुग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रुग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रुग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

वाचा:

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली. परंतु ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यांतून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांत आले आहे. परिणामी रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा काळाबाजार सुरू केला आहे. एकीकडे गरीब रुग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रेमडेसिवीरसाठी नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खासगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. याबाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरीब रुग्णांचे प्राण वाचवावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here