वृत्तसंस्था, मुंबई

दुचाकींच्या उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या बजाज समूहाने आपली पहिली ई-स्कूटर दाखल केली आहे. स्कूटरच्या विश्वात एकेकाळी अधिराज्य गाजवणाऱ्या या कंपनीच्या चेतक ब्रँडच्याच नावाने ही ई-स्कूटर ओळखली जाईल. मुंबईत मंगळवारी या स्कूटरच्या दोन मॉडेलचे अनावरण करण्यात आले.

दोन प्रकारच्या या स्कूटरची किंमत एक लाख व एक लाख पंधरा हजार रुपये आहे. मात्र यात विमा व रस्ते कराचा समावेश नाही. या स्कूटरना लिथियम बॅटरी देण्यात आली असून पाच तासांत ती १०० टक्के चार्ज होईल. ही स्कूटर ताशी ८५ ते ९५ किमी.चा वेग पकडू शकेल, असे कंपनीने म्हटले आहे. ई-चेतकमुळे दुचाकींच्या क्षेत्रात नव्या युगाची नांदी होत आहे, अशी प्रतिक्रिया बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी व्यक्त केली.

कुठे मिळणार?

ही स्कूटर बाजारात १५ जानेवारीपासून उपलब्ध होईल. मात्र सध्या पुणे व बेंगळुरू येथील शोरूममध्येच तिची विक्री होईल. चेतकच्या वेबसाइटवर केवळ दोन हजार रुपये जमा करूनही तिची नोंदणी करता येणार आहे. बजाज ऑटोच्या चाकण (पुणे) येथील प्रकल्पात या स्कूटरचे उत्पादन होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here