करोना रुग्णांच्या मृत्युंमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. करोनाने मृत्यूच्या बाबतीत भारत अमेरिका आणि ब्राझीलनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेबसाइटनुसार, करोनाने ब्राझीलमध्ये आतापर्यंत १४४,७६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर मेक्सिकोमध्ये ७८,०७८ मृत्यू झाले असून हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. देशात ३० जानेवारीला पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर गेल्या ८ महिन्यांत सप्टेंबरमध्ये देशात केवळ ४१.५३ टक्के म्हणजे २६ लाख २१ हजार ४१८ नवीन रुग्ण आढळून आले.
भारत दुसर्या क्रमांकावर
करोना रुग्णसंख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. करोना रुग्णांमध्ये अमेरिकेनंतर भारत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. वेबसाइटनुसार, अमेरिकेत ७,५०७,५२४ करोना रुग्ण आहेत. आतापर्यंत जगात २ कोटी ५७ लाख ७३ हजार ७६४ नागरिक करोनाने बरे झाले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण ५३,९३,७३७ आजार रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर ब्राझीलमध्ये ४,२१२,७७२ आणि अमेरिकेत ४,७५०,१७६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.
या महानगरांमध्ये चिंतेची बाब
दिल्ली आणि मुंबई या दोन महानगरांमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी दिल्लीत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राजधानी दिल्लीतील करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही ५४३८ वर पोहोचली आहे. तर २९२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २.८५ लाख झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी २९ सप्टेंबरला ४८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times