मुंबईः ‘हाथरस बलात्कार प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजाबाबदार, अमानवी पद्धतीने हाताळल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणात मुंबईत गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशात पाठवावे,’ अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे शुक्रवारी केली.

‘देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसते. मुंबईत याप्रकरणी गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो, असे ट्वीट सरनाईक यांनी केले आहे.

‘ज्या प्रमाणे सुशांतसिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलीसांनी तक्रार दाखल केली होती. त्याचप्रकारे हे प्रकरण ही मुंबईत यावर गुन्हा नोंदवून घ्यावा. भविष्यात हे प्रकरण सीबीआयकडे सोपावलं तरी आम्हाला काहीच हरकत नाही,’ असंही सरनाईक म्हणाले आहेत.

‘हाथरसमधील त्या पीडित तरुणीचे अंत्यसंस्कार रात्रीच्या वेळी करण्यात आले, यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आङेत. त्यामुळं महाराष्ट्रातदेखील याप्रकरणी तक्रार दाखल व्हायला हवी, उत्तर प्रदेशमध्ये जाऊन संपूर्ण घटनेची चौकशी करतील,’ अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here