रियाध : जागतिक पर्यटन नकाशावर सर्वांत आणि प्रमुख आकर्षणाचे केंद्र असलेल्या दुबईतील प्रसिद्ध ‘बुर्ज खलिफा’ची उभारणी करणारी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ‘अरबटेक’ कंपनीने दिवाळखोरी (Burj Khalifa builder headed for ) जाहीर केली आहे. कंपनीच्या या घोषणेने दुबईत एकाच खळबळ उडाली आहे. कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. मात्र ही कंपनी बुडाली तर दुबई आणि आखाती प्रदेशातील किमान ४० हजार कर्मचारी बेरोजगार होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मागील नऊ महिन्यात करोना व्हायरसने जगभरातील बड्या बड्या कंपन्यांना जबर दणके दिले आहेत. कारखाना उत्पादन, तेल उत्पादक, विमान कंपन्या, वाहन, धातू क्षेत्रात अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. करोनाने आता पर्यटन कंपन्या आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात दणके देण्यास सुरुवात केली आहे.

जवळपास दशकभरापासून आखाती प्रदेशात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अरबटेक या कंपनीने अनेक टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. मात्र हीच कंपनी आता आर्थिक संकटात सापडली आहे. संयुक्त अरब अमिराती सरकारने कंपनीला आर्थिक मदत बंद केल्यानं कंपनीवर दिवाळखोरीची नामुष्की ओढवली आहे. दिवाळखोरीची अंतिम सुनावणीपूर्वी तोडगा काढण्यासाठी अरबटेकच्या संचालक मंडळाकडे गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी आता दोन महिन्यांचा अवधी आहे. कंपनी बुडाली तर आखातातील किमान ४० हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.

दुबईत स्थावर मालमत्ता क्षेत्रावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीच्या काळात कंपनीला मर्यादित प्रमाणात नवी कंत्राटे मिळाली. त्यामुळे कंपनीपुढे इतका मोठा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अरबटेकने दिवाळखोरीत जाण्याची तयारी सुरु केली असल्याचे अर्कोम कॅपिटलचे जॅप मजेर यांनी सांगितले.

तोटा वाढला अरबटेकला चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल २१६ दशलक्ष डॉलरचा तोटा झाला आहे. तर आतापर्यंतचा एकूण तोटा ३९८ दशलक्ष डॉलर म्हणजे स्थानिक चलनात हा तोटा १.४६ अब्ज दिरहॅम इतका वाढला आहे.

गांधी जयंती निमित्ती केली होती बुर्ज खलिफावर आकर्षक रोषणाई
दुबईत आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी याच बुर्ज खलिफावर महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्त त्यांची छबी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वांत उंच इमारत म्हणून ओळखली जाते. या इमारतीची उंची ८२९.८ मीटर आहे. यात १६३ मजले आहेत. २०१० मध्ये ही इमारत पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. याची निर्मिती अरबटेक या कंपनीने केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here