मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थांच्या वापराची आणि त्याच्या विक्रीची नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरो चौकशी करत आहे. हिचे ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर एनसीबी सक्रिय झाली. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात रियासह अनेकांना अटक करण्यात आली. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री , , श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी करण्यात आली होती. चौघांनीही ड्रग्ज घेण्यास नकार दिला होता. मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड सेलिब्रिटी गोव्यात ड्रग्ज डिटॉक्ससाठी सातत्याने जातात.

खास डिटोक्ससाठीच जातात गोव्यात

Republic SIT नुसार बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी डिटॉक्ससाठी गोव्यात जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंगसाठी किंवा सुट्टीसाठी ते व्हिला बुक करतात असं सांगतात पण मुळात ते डिटॉक्ससाठीच आलेले असतात. रिपोर्ट्सनुसार, सेेलिब्रिटी जाणीवपूर्वक असं करतात जेणेकरून जेव्हा ड्रग्ज टेस्ट होते तेव्हा कोणतेही पुरावे सापडत नाहीत.

अशा प्रकारे ते आपली ओळख लपवतात

अशाच एका व्हिलाच्या केअरटेकरने सांगितलं की सेलिब्रिटी शक्यतो एजन्टमार्फत संपर्क करतात. यामुळे सेलिब्रिटींची ओळख बाहेर होऊ नये यासाठीच ते मध्यस्थिची मदत घेतात. एनसीबीच्या चौकशीच्याआधी सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि करण जोहर कुटुंबासोबत गोव्यात जाऊन आले होते.

एनसीबीच्या रडारवर अनेक बिग स्टार्स

एनसीबीने ड्रग्ज लिंकमध्ये रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि क्षितीज प्रसाद यांच्यासह अनेक ड्रग्ज डिलर्सला अटक केली आहे. याशिवाय अनेक मोठे कलाकार एनसीबीच्या रडारवर असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळताच त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here