नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा बोगदा ‘अटल बोगद्याचे’ आज शनिवारी हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे उद्घाटन केले. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हा बोगदा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर इतकी आहे. या उद्घाटन समारोहात पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. या बोगद्यामुळे आता मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने अंतर कमी झाले आहे. तसेच संपूर्ण प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ९.०२ किलोमीटर लांबीचा या बोगद्यामुळे आता वर्षभर लाहोल स्पिती खोऱ्याशी संपर्क सुरू राहणार आहे. या पूर्वी हिमवर्षावामुळे या खोऱ्याचा संपर्क सहा महिन्यांसाठी तुटलेला असायचा.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी हिमाचलमध्ये घालवलेल्या दिवसांची स्मृती जागवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत मोदी नेहमीच येथे येत असत. आज केवळ अटलबिहारी वाजपेयी यांचेच स्वप्न पूर्ण झाले नसून, आज हिमाचल प्रदेशातील कोट्यवधी लोकांची दशकांपासूनची प्रतीक्षा संपलेली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here