केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाराणसीत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी हे नेहमीच राजकारण करण्यासाठी अग्रेसर असतात, मात्र राष्ट्रनीतीमध्ये नरेंद्र मोदी हेच यशस्वी झालेले असल्याचे त्या म्हणाल्या. स्वतंत्र झालेल्या देशाने काँग्रेसचे चाल ओळखली असल्याचे मला वाटते. कोणीही नेता कोणत्याही विषयात राजकारण करू पाहत असेल तर मी त्यांना रोखणार नाही, मात्र हाथरसला भेट देणे हे केवळ राजकारण असून यात पीडितेला न्याय देण्याचा उद्देश नसल्याची टीका इराणी यांनी केली आहे.
‘एसआयटीचा अहवाल येऊ द्या’
मला काही घटनात्मक मर्यादा आहेत, म्हणून मी कोणत्याही राज्यांमधील प्रकरणात लक्ष घालत नाही. मात्र, मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीचे गठन केले आहे. कालच पोलिस अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीचा अहवाल येऊ द्या. त्यानंतर ज्या लोकांनी हस्तक्षेप केला किंवा ज्यांनी पीडितेला न्याय मिळू नये यासाठी कट रचला, अशा लोकांविरोधात योगी कठोर कारवाई करतील, असे इराणी म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
‘राहुल गांधी यांनी गहलोत यांनाही फोन करावा’
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील स्मृती इराणी यांनी वक्तव्य केले आहे. तेथील मुली आपल्या मर्जीने गेल्या होत्या हे अशोक गहलोत यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या. या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी अशोक गहलोत यांना फोन केला पाहिजे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times