दिलीप शहा यांच्या आईची चेन चोरांनी चोरली होती. त्यावेळी दिलीप शहा हे अवघ्या २० वर्षाचे होते. दिलीप शहा यांना रेल्वे पोलीस आयुक्त कार्यालयातून त्यांना पत्र आले असून मुद्देमाल नेण्यास सांगितले होते. मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात १०४ जणांना त्यांचे चोरीला गेलेले दागिने, वस्तू रेल्वे पोलिसांनी परत केल्या. त्यात शहा यांचा समावेश होता. शहा यांनी सांगितले की, आई दररोज सोन्याची चेन घालत असे. त्यावेळी माझे वय २० वर्ष होते. चोरीनंतर आम्ही पोलीस तक्रार केली होती. त्यानंतर तपासात प्रगती नसल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे पाठपुरवठा करणे सोडून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी ही केस पुन्हा सुरू केली. दोन वर्षांपूर्वी शहा यांच्या जुन्या पत्त्यावर पोलिसांनी पत्र पाठवले आणि तपासाबाबत माहिती दिली. पोलीस ठाणे आणि कोर्टात अनेक फेऱ्या माराव्या लागल्याचे शहा यांनी सांगितले. दिलीप शहा यांची आई हयात नाही. मात्र, ९३ वर्षांचे वडील हयात असून ही चेन एका मंदिराला ते दान करणार आहेत.
भाईंदर येथे राहणाऱ्या भावना देसाई यांना देखील जवळपास तीन दशकानंतर त्यांची सोन्याची चेन सापडली. त्यावेळी माझे वय २८ वर्ष होते. विद्याविहार स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून चालत घरी जात असताना चोरांनी चेन पळवली असल्याची आठवण देसाई यांनी सांगितली. काही दागिने त्यावेळी स्वत: च्या पैशातून बनवले होते. त्यातील चोरीला गेलेली सोन्याची चेन पुन्हा मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times