तू आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी या चित्रपटातील तुझी ही भूमिका किती वेगळी आहे?
दाह या सिनेमातील माझी भूमिका मी आधी साकारलेल्या सर्व भूमिकांपैकी अत्यंत वेगळी आहे. त्यात बऱ्यापैकी संघर्ष आहे. ती एकाच वेळी अनेक गोष्टींशी लढते आहे. मुलगी, डॉक्टर, समाजसेवक अशा विविध छटा या भूमिकेमध्ये आहेत. त्यामुळे हि भूमिका मी आधी साकारलेल्या भूमिकांपैकी वेगळी आहे आणि अवघड आहे. अशी भूमिका साकारताना ती भूमिका खोटी वाटू नये, आपल्यातली वाटावी यासाठी मी प्रयत्न केला.
या चित्रपटाचा विषय वेगळा आहे, ही भूमिका तुला का साकारावीशी वाटली ?
समाजातील वास्तव मांडणारा हा सिनेमा आहे. मुलगी आणि तिच्या आई वडिलांमधील नातं यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. अनेक संकटांना तोंड देत, त्यांच्याशी संघर्ष करत कशी समाज सेवा करता येते, यावर हा सिनेमा आधारित आहे. त्यामुळे हा सिनेमा मी स्वीकारला.
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच्या पडद्या मागील काही आठवणी आहेत का?
सिनेमामधील गाणं आम्ही उलट शूट करणार होतो पण वेळे आभावी व काही तांत्रिक कारणांमुळे आम्हाला हवं तस गाणं शूट करता आलं नाही. गाण्यातील शब्द खूप फास्ट बोलायचे होते आणि नंतर ते स्लो मोशन मध्ये होणार होत.या सगळ्याचा सराव आम्ही खुप एन्जॉय केला.
नात्यांवर हा चित्रपट आधारित आहे, या लॉकडाऊन दरम्यान तु नात्यांबद्दल काही धडा शिकली आहेस का? प्रेक्षकांना जीवनातील नातेसंबंधांबद्दल तु काही संदेश देऊ इच्छितेस का ?
नक्कीच, आपल्या आयुष्यात कुटुंबाला आणि आपल्या जवळच्या लोकांना किती महत्व आहे याची जाणीव मला या लॉकडाउनमध्ये झाली. आपली जवळची माणसं जरी असतील तरी कोणाला गृहीत धरता काम नये. आपले आई वडील, बहीण भाऊ, मित्रमंडळी यांना आपण गृहीत धरतो आणि वेळ देत नाही. आपण यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे हि गोष्ट मला या लॉकडाउनमध्ये प्रकर्षाने जाणवली.
झी टॉकीज ‘दाह’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करणार आहे, या बद्दल तु प्रेक्षकांना काय आवाहन करशील?
झी आणि माझं एक स्पेशल नातं आहे. मी माझं पाहिलं काम झी सोबत केलं आहे. मी ज्या सिनेमांमध्ये काम केल आहे ते सिनेमे झी टॉकीज वर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत याचा मला खूप आनंद होत आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर आणि झी टॉकीजवर भरभरून प्रेम केलं आहे. हे प्रेम असच कायम राहूद्या हेच मी प्रेक्षकांना सांगेन. ४ ऑक्टोबर रोजी दाह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर ही संधी कोणी सोडू नये अशी विनंती मी प्रेक्षकांना करते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times