वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घरांच्या विक्रीवर एका बाजूला परिणाम झालेला दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्या घरांचा पुरवठा घटल्याचेही स्पष्ट झाला आहे. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात नव्या घरांचा पुरवठा देशातील आघाडीच्या सात शहरांतून सुमारे ६० टक्के घटला असल्याचे निरीक्षण अॅनारॉक या मालमत्ता सल्लागार संस्थेने नमूद केले आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या काळात नव्या सदनिकांचे अर्थात घरांचे बांधकाम फारसे होऊ शकलेले नाही. घोषित केलेले अनेक गृहप्रकल्प अर्ध्यातच बंद पडले आहेत किंवा अनेक गृहप्रकल्पांची विकासकांनी केवळ वचने दिली आहेत, तर काही गृहप्रकल्पांतून संबंधित विकासकांनी माघारही घेतली आहे. देशातील सात आघाडीच्या शहरांमध्ये गेल्यावर्षी याच काळात १,८४,७०० नवी घरे बांधली गेली होती. मात्र यंदा या काळात केवळ ७५,१५० घरांचे बांधकाम होऊ शकले आहे. त्याचवेळी तयार घरांची विक्री ५७ टक्क्यांनी याच काळात घसरली असून या ९ महिन्यांमध्ये ८७,४६० घरांची विक्री झाली आहे.


असा आहे नव्या घरांचा पुरवठा

शहर २०२० २०१९
दिल्ली एनसीआर १३,०१० २७,३९०
मुंबई एमएमआर १८,३८० ६३.९३०
बेंगळुरू १५,०२० २९,४४०
पुणे १२,७२० ३६,५४०
हैदराबाद ८,२९० ११,०५०
चेन्नई ५,२४० ९,५८०
कोलकाता २,४९० ६,७७०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here