अबुधाबी: युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि कर्णधार (ViratKohli) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेटनी ( Royals by 8 wickets ) पराभव केला. RCBचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ६ बाद १५४ धावा केल्या. विजयाचे लक्ष्य बेंगळुरूने सहज पार केले.

वाचा-
आयपीएलच्या १३व्या हंगामात आज पहिला डे सामना राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यात झाला. राजस्थानचा कर्णधार स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्मण घेतला. पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. बेंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांची अवस्था ३ बाद ३१ अशी केली होती. प्रथम स्मिथ ५, नंतर बटलर २२ आणि त्यानंतर संजू सॅमसन ४ धावांवर बाद झाले. त्यानंतर उथप्पा १७ धावा करून बाद झाला.

वाचा-
राजस्थानकडून महिपालने सर्वाधिक ४७ धावा केल्या. अखेरच्या काही षटकात राहुल तेवतियाने १२ चेंडूत २४ आणि जोफ्रा आर्चरने १० चेंडूत १६ धावा करत राजस्थानला एक सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.

वाचा-

विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूची सुरुवात खराब झाली. एरॉन फिंच ८ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर देवदत्त पडिक्कल सोबत दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांचा भागिदारी केली. ही भागिदारी RCBच्या विजया पाया ठरली. देवदत्तने आयपीएल २०२० मधील तिसरे अर्धशतक केले. तर विराट कोहलीने आधी जम बसवला आणि मग धडाकेबाज शॉट खेळले. त्याने ५३ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. तर एबी डिव्हिलियर्सने नाबाद १२ धावा केल्या.

वाचा- वाचा-

या विजयासह बेंगळुरूने गुणतक्त्यात ६ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here