नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार आणि पक्षाच्या महासचिव यांना आज पुन्हा एकदा पोलिसांचा सामना करावा लागला. उत्तर पोलिसांकडून राहुल – प्रियांका यांच्यासहीत पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी देण्यात आलीय. त्याअगोदर दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर आज पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

शनिवारी प्रियांका गांधी स्वत: गाडीचा ताबा आपल्या हातात घेत डीएनडीपर्यंत पोहचल्या. त्यांच्यासोबत गाडीत राहुल गांधीही बाजुच्याच सीटवर बसले होते. काँग्रेसच्या ३५ खासदारांसह काही कार्यकर्तेही त्यांच्याच मागोमाग हाथरसकडे निघाले होते. डीएनडी फ्लायओव्हरवर पोहचताच पोलिसांनी थांबवल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.

वाचा :

वाचा :

काही वेळानं उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल-प्रियांका यांच्यासहीत पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली. परंतु, इतर कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरल्यानं पोलिसांनी पुन्हा एकदा लाठीचार्जचा मार्ग स्वीकारला. यावेळी, प्रियांका गांधी यांनी स्वत: गाडीतून उतरून आपल्या कार्यकर्त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांना लाठीचार्जपासून रोखण्याचाही प्रयत्न केला.

यावेळी प्रियांका यांची गाडी टोलच्या बॅरियरवर होती. गाडीतून उतरून त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार कमांडो कमल किशोर यांना पोलिसांच्या मारहाणीपासून वाचवलं. या दरम्यान त्यांनी एक काठीही पकडली. यानंतर त्यांनी कमल किशोर यांना रस्त्यातून थोडं बाजूला नेऊन एका जागी बसवलं.

दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना ‘पोलिसांनी प्रियांका यांच्यावरही लाठीचार्ज’ केल्याचा आरोप केलाय.

यावेळी, शेकडोंच्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांना समजावण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी घेतली. पोलिसांनी आपल्याला हाथरसला जाण्याची परवानगी दिलीय. पोलिसांना सहकार्य करा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केलं. त्यानंतर, पी एल पुनिया, गुलाम नबी आझाद, प्रमोद तिवारी हे काँग्रेस नेते राहुल – प्रियांका यांच्यासोबत हाथरसकडे रवाना झाले.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here