लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलिया विधानसभा मतदारसंघातील यांनी उत्तर प्रदेशातील वाढत्या बलात्कार प्रकरणावर बोलताना अजब तर्क लढवल्याचं समोर येतंय. ‘मुलींवर संस्कार नसल्यानं बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याचं’ सांगत सुरेंद्र सिंह यांनी मुक्ताफळं उधळलीत.

आपल्या तरुणी मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत, अशी वक्तव्य भाजप आमदारांनी व्यक्त केली आहेत. एका चॅनलशी बोलताना आमदार महोदयांनी आपली मतं जनतेसमोर मांडलीत.

वाचा :

वाचा :

उत्तर प्रदेशात रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारसारख्या घटना समोर येतात, याचं कारण काय? असा सवाल सुरेंद्र सिंह यांना करण्यात आला होता. यावर उत्तर देताना आमदार महोदय म्हणाले, ‘मी आमदारासोबतच एक शिक्षकही आहे. या घटना केवळ संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात. शासन आणि तलवार त्यांना रोखू शकत नाही’.

‘आपल्या तरुण मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे परंतु, कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथं मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कुणीही समोर येणार नाही’ असंही त्यांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here