vs , : केकेआरवर आज दिल्लीचा संघच भारी पडल्याचे पाहायला मिळाले. कारण फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्ये दिल्लीचा संघ केकेआरपेक्षा सरस ठरला. दिल्लीने यावेळी २२९ धावांचे मोठे आव्हान केकेआरला दिले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग केकेआरला करता आला नाही. त्यामुळे दिल्ली या सामन्यात केकेआरवर सहजपणे विजय साकारला.

दिल्लीच्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना दुसऱ्याच षटकात सुनील नरिनच्या रुपात धक्का बसला. त्यानंतर शुभमन गिल आणि नितिश राणा यांनी चांगली भागीदारी रचली. पण गिलला यावेळी मोठी खेळी साकरण्यात अपयश आहे, त्याला २८ धावाच करता आल्या. पण राणाने मात्र यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले. राणाने ३५ चेंडूंत चार चौकार आणि चार षटाकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

कोलकाताचे आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक हे या सामन्यात मोठी खेळी साकारू शकले नाही आणि याचाच फटका केकेआरच्या संघाला बसला. केकेआरने आपला अर्धा संघ ११८ धावांत गमावला होता. त्यामुळेच त्यांना धावांचा यशस्वीपणे पाठलाग करता आला नाही.

दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी यावेळी कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी साव यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने यावेळी या आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या रचली. दिल्लीने यावेळी केकेआरपुढे २२९ धावांचे आव्हान ठेवले. श्रेयसने यावेळी ३८ चेंडूंत सात चौकार आणि सहा चौकरांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची तुफानी खेळी साकारली.

केकेआरने यावेळी नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या सलामीवीरांनी या गोष्टींचा चांगलाच फायदा उचलला. कारण आतापर्यंत दिल्लीला मोठी सलामी पाहायला मिळाली नव्हती. पण पृथ्वी साव आणि शिखर धवन यांनी यावेळी ५६ धावांची सलामी दिली. पण धवन आऊट झाला आणि ही जोडी फुटली. धवनने यावेळी १६ चेंडूंत २६ धावा केल्या. धवनाला यावेळी युवा गोलंदाज वरुण चक्रवर्तीने इऑन मॉर्गनकरवी झेलबाद केले.

धवन आऊट झाल्यावरही पृथ्वीची धडाकेबाज फलंदाजी सुरु होती. पृथ्वीने यावेळी हंगामातील पहिले अर्धशतकही पूर्ण केले. कमलेश नागरकोटीने यावेळी पृथ्वीला बाद करत केकेआरला मोठे यश मिळवून दिले. पृथ्वीने यावेळी ४१ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली. पृथ्वी बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या खांद्यावर घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here