शनिवारी हाथरसकडे निघालेल्या आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हरजवळ पोलिसांनी रोखलं. याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांदरम्यान झटापट झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रियांका गांधी स्वत: पुढे आल्या. त्यावेळचा हा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. हे फोटो काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेअर करतानाच सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलंय.
वाचा :
वाचा :
चांदणी चौकच्या माजी आमदार आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केलाय. ‘निशब्द आहे’ असं अलका लांबा यांनी या फोटोसोबत म्हटलंय.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही हा फोटो शेअर करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. ‘याहून लज्जास्पद आणि घातक आणखी काही असू शकतं का?’ असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.
वाचा :
वाचा :
काँग्रेससोबतच, या फोटोवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर हल्लाबोल केलाय. ‘योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
दिल्ली – नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. काही वेळाच्या धुमश्चक्रीनंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासहीत केवळ पाच नेत्यांना हाथरसकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापटी सुरू असताना प्रियांका गांधी गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी पोलिसांना आपल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जपासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी माजी खासदार कमांडो कमल किशोर यांचा पोलिसांच्या लाठीचार्जपासून बचाव करत त्यांना मुख्य रस्त्यावरून बाजुला घेत धीर दिला.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times