नवी दिल्ली: राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रथमच राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. आदित्य यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्या वेळी आदित्य यांनी राहुल गांधी यांची भेट झाली नव्हती.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत.

राहुल-आदित्य भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण

महाराष्ट्रात आणि देशात मकर संक्रांतीचा सण साजरा होत असताना आदित्य ठाकरे यांनी राहुल यांची भेट घेत शिवसेना आणि काँग्रेसच्या संबंधांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आदित्य हे राहुल यांच्याशी आघाडी सरकारच्या धोरणांबाबत चर्चा करू शकतात. त्याच प्रमाणे तीन पक्षांचे सरकार चालवताना येत असलेल्या अडचणीबाबतही हे दोन नेते चर्चा करू शकतात.

या बरोबरच, दिल्लीत होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांबाबत आदित्य ठाकरे राहुल गांधींशी चर्चा करू शकतात असेही म्हटले जात आहे. या बरोबच आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री असल्याने या खात्याशी संबंधित काही मुद्दायांवरही ते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here