वाचा:
( वय ५९, रा. नक्षत्रवाडी ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडील त्यांच्या मोबाइलमध्ये असलेली , यांसारखी वाणिज्यिक ॲप चालत नव्हती. त्यांच्या मोबाइलवर वारंवार असा संदेश येत होता.
जनार्दन लोंढे यांनी फोन पे चा पिन रिसेट करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला. हा फोन लावल्यानंतर त्यांना मोबाइलवरून एका व्यक्तीने संपर्क केला. मी फोन पे च्या कस्टमर केअर मधून बोलतोय, असे सांगून त्याने जनार्दन लोंढे यांचा विश्वास संपादन केला. पिन रिसेट करण्यासाठी आधार कार्ड तसेच संबंधित कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले. सदर कागदपत्रे तपासण्यासाठी एनी डेस्क ॲप डाऊनलोड करा, अशा सूचना भामट्याने दिल्या.
वाचा:
लोंढे यांनी एनी डेस्क ॲप डाऊनलोड केल्यानंतर सायबर भामट्यांनी मोबाइलचा कंट्रोल घेऊन काही क्षणांतच जनार्दन लोंढे यांच्या खात्यातून सुरुवातीला २५ हजार रुपये तर त्यानंतर एक लाखाच्या वर अशी एकूण एक लाख ४५ हजार रुपये इतकी रक्कम काढून घेतले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times