वाचा:
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलची भेट आटोपून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हुतात्मा पार्कला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन व सूचना करून ते गेटमधून बाहेर पडताच त्यांना समोर रस्त्यावर एक युवक मोटरसायकल थांबवून मास्क काढून रस्त्यावर थुंकताना दिसला, त्याक्षणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी गाडीतून खाली उतरले व त्यांनी त्या तरुणाला पकडले. रस्त्यावर थुंकल्याबद्दल त्याला १ हजार रुपयांचा दंड आयुक्तांनी केला. आपली चूक युवकाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ १ हजाराचा दंड भरला.
वाचा:
कोल्हापूर शहर थुंकीमुक्त करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून संसर्ग रोखण्यासाठी यापुढे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यांवर थुंकू नये, असे आवाहनही आयुक्त कलशेट्टी यांनी केले आहे. तसेच शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. यापुढील काळातही विना मास्क फिरणाऱ्यांवर तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times